'जो झाडे वाढवितो तोच निसर्गाचा खरा उपासक होय.' या विधानाबद्दल माहिती पुढे वाचा व योग्य विधान कोणते, ते सांगा.
अ. वरील वाक्य हे मिश्र वाक्य आहे.
ब. जो झाडे वाढवितो हे प्रधान वाक्य आहे.
क. तोच निसर्गाचा खरा उपासक होय, हे गौण वाक्य आहे.
ड. जो झाडे वाढवितो या वाक्याला विशेषण वाक्य असेही म्हणता येईल.
किंकर या शब्दास खालीलपैकी कोणता समानार्थी शब्द आहे ?
सौजन्य या शब्दाचा विरुद्ध अर्थाचा शब्द कोणता ?
पुढील शब्दांपैकी 'रान' या शब्दाचा समान अर्थ नसलेला शब्द सांगा.
संस्कृतमधून अनेक साधित शब्द मराठीत आले आहेत त्यांना ________ अशी संज्ञा आहे.
पुढीलपैकी अंशाभ्यस्त शब्द ओळखा.
'तूप' हा शब्द कोणत्या भाषेपासून मराठीत आला ?
मराठीमध्ये स्पर्श व्यंजने एकंदर ________ आहेत.
तर, जरी, म्हणजे, की, तरी या उभयान्वयी अव्ययांचा प्रकार कोणता ?
'तुम्हाला एवढे कर्णकर्कश संगीत ऐकवते तरी कसे?' या वाक्यातील ऐकवते या क्रियापदाचा प्रकार ओळखा.
'कू', 'च्', 'त्', 'ट्', 'प्' हे परंपरागत व्यंजनध्वनी कोणत्या प्रकारात मोड़तात ?
पुढील वाक्प्रचारांची चुकीची जोडी ओळखा.
'केसरी' या शब्दाचा अचूक समानार्थी शब्द कोणता ? योग्य पर्याय निवडा.
अ. पंचानन
ब. केशर
क. सिंह
ड. पंचेन्द्रीय
'पात्र' या शब्दाचे विविध अर्थ घेऊन खालील वाक्ये तयार केली आहेत. त्यापैकी पात्र या शब्दाचा योग्य अर्थ असलेली वाक्ये ओळखा.
अ. देवपूजेसाठी हे पात्र काय कामाचे ?
ब. हा बावळट माणूस येथे काय उपयोगाचा ?
क. नदीला पूर आल्याने नदीचा विस्तार मोठा झाला आहे.
ड. त्याला शिक्षक होण्यासाठी डी.एड्. व बी.एड् करणे जरूरीचे आहे.
'प्रीत्यर्थ' या शब्दाचा संधीविग्रह करा.
पुढीलपैकी कोणता शब्द तत्सम या गटातील आहे ?
पुढीलपैकी कोणता/कोणते शब्द जोडाक्षर आहे/आहेत ?
अ. अक्षर
ब. संयुक्त
क. गृहपाठ
'लोक आपली स्तुती करोत किंवा निंदा करोत' या वाक्याचा प्रकार ओळखा.
क्रियाविशेषण साधित धातू ओळखा.
उभयान्वयी अव्ययाचा उपप्रकार ओळखा.
'त्याच्या अंगात आले.' या वाक्यातील प्रयोग ओळखा.
पुढीलपैकी कोणते विधान चूक आहे ?
अ. ओझरत्या अन स्पष्ट उच्चारांना अनुनासिक असे म्हणतात.
ब. अक्षरे म्हणजे पूर्ण उच्चाराचे वर्ण.
क. ज्या वर्णाचा उच्चार स्वराच्या साहाय्यावाचून पूर्ण होत नाही त्यांना व्यंजने म्हणतात.
ड. सर्व स्वर व स्वरयुक्त व्यंजने यांना अक्षरे म्हणतात.
शहाणा - शहाणपणा हे कोणत्या प्रकारचे नाम आहे ?
ग्रंथकार, गृहस्थ, द्विज या शब्दांचा समास कोणता ?
'कोल्हा काकडीला राजी' या म्हणीचा योग्य अर्थ ओळखा.
पुढीलपैकी व्याकरणदृष्ट्या शुद्ध शब्द कोणता, ते अचूक सांगा.
पुढीलपैकी अभ्यस्त शब्द कोणता ?
'चतुर्भूज होणे' याचा समानार्थी वाक्प्रचार कोणता ?
फक्त हनुमंतच समुद्र ओलांडून जाऊ शकतो. या वाक्याचा अर्थ बदलू न देता नकारार्थी वाक्यात रूपांतर कसे होईल ?
अ. हनुमंताखेरीज दुसरा कोणताही वानर समुद्र ओलांडून जाऊ शकत नाही.
ब. हनुमंताशिवाय समुद्र ओलांडून जाणारा दुसरा कोणीच नाही.
क. हनुमंताशिवाय समुद्र ओलांडून जाऊ शकणारा नाहीच.
ड. दुसरा कोणीही हनुमंतासारखा समुद्र ओलांडून जाऊ शकत नाही.
पुढील उतारा वाचून खालील प्रश्नांची (प्रश्न क्र. 30 ते 34) उत्तरे अचूक निवडा:
मराठी संतवाङ्मयाचा विस्तार मोठा असला तरी त्यात विविधता कमी आहे. वारकरी संतांच्या वाङ्मयातही पांडुरंग व पंढरपूर यांचे श्रेष्ठत्व, नामाचा महिमा, संताची लक्षणे, नीतितत्त्वांचा उपदेश, भक्तिपंथाची सुगमता इत्यादी विषयांना प्राधान्य आहे. अध्यात्म, योगसाधना, वर्णधर्म व चित्तशुद्धी यांसंबंधी त्यांनी आपले विचार आपल्या अभंगांतून मांडलेले आहेत. संतांचे तत्त्वज्ञान, श्रद्धास्थाने व उपासना पद्धती यांत सारखेपणा असला, तरी त्यांच्या आत्मपर वाङ्मयात एकजिनसीपणा नाही. त्यांचे सारे लक्ष परमार्थमार्गावरच केंद्रित झाले होते यात शंका नाही. पण परमार्थसाधनेतही माणसामाणसातील संबंधांचा विचार अटळच नव्हे तर आवश्यक आहे असे त्यांना वाटत होते. अर्थातच त्यांच्या वाङ्मयात भोवतालच्या सामाजिक परिस्थितीचे पडसाद उमटले आहेत.
निवृत्तिनाथ, ज्ञानेश्वर, विसोबा खेचर, जगमित्र नामा, यांच्यासारख्या उच्चवर्णीय संतांनी भेदभाव, वर्णवर्चस्व, कर्मठपणा व पढिकता यांचा निषेध केला आहे. नामदेवप्रभृती बहुजनसमाजातील संतांच्या अभंगात भावनोद्रेकाचा अंश अधिक आहे. सामाजिक विषमतेचे शल्य त्यांच्या मनात सलत राहते. तसे पाहिले तर हे संत व्यक्तिगत रागलोभांच्या पलीकडे गेले होते. पण सामाजिक अपप्रवृत्तींबद्दलची खंत त्यांच्या उद्गारांतून व्यक्त होतेच होते. चोखामेळ्यासारखे संत तर समाजाच्या अगदी खालच्या थरात, अस्पृश्य जातीत जन्मलेले. अठराविश्वे दारिद्र्य आणि सामाजिक गुलामगिरी ही त्यांची पिढ्यानपिढ्यांची मिरास. त्यांना उच्चारस्वातंत्र्य ते कितीसे असणार ? नामदेवांच्या कृपेने त्यांना नवी वाट गवसली होती. नव्या जाणिवांनी त्यांचे मन भारलेले होते. मात्र त्या दिशेने जरा कुठे हालचाल केली की सनातन्यांचा रोष ठेवलेलाच. म्हणून आपल्या अंतरीच्या व्यथा निवेदन करताना ते पराकाष्ठेची लीनता स्वीकारतात.
वरील उताऱ्यानुसार संतांचे सारे लक्ष कशावर केंद्रित झाले होते ?
अ. अध्यात्म
ब. योगसाधना
क. परमार्थ
ड. वर्णधर्म
नामदेव प्रभृती संतांच्या अभंगात कशाचा अंश अधिक आहे?
उताऱ्यानुसार संत हे कशाच्या पलीकडे गेले होते ?
नामदेवांच्या कृपेने कुणाला नवी वाट गवसली होती ?
चोखामेळा पराकाष्ठेची लीनता का स्वीकारतात ?
अ. सनातन्यांच्या रोषांमुळे
ब. सामाजिक गुलामगिरीमुळे
क. अठराविश्वे दारिद्रयामुळे
ड. अस्पृश्य जातीत जन्मल्यामुळे
'गणपतीची मिरवणूक आमच्या घरावरुन पुढे गेली.' या वाक्यातील ध्वन्यार्थ कोणता ?
'रामा जलद वाचतो' व 'रामा फार उतावळा आहे.' ही वाक्ये कोणत्या अव्ययाची उदाहरणे आहेत ?
समासाचा विग्रह करताना ज्या ज्या विभक्ती प्रत्ययांचा संबंध येतो, त्यावरून तत्पुरुष समासाचे प्रकार पडतात. खालील चतुर्थी तत्पुरुष समासाच्या प्रकाराचे उदाहरण अचूक सांगा.
'गळयाशी येणे' या वाक्प्रचाराचा अचूक अर्थ असलेला पर्याय ओळखा.
पुढीलपैकी न्यूनत्वबोधक वाक्य कोणते, ते ओळखा.
निर्मला तिच्या नोकरी करणाऱ्या सुनेचा सगळा त्रास सहन करते. कारण - (योग्य म्हणीचा वापर करा.)
'घर फिरले की घराचे वासेही फिरतात.' या म्हणीच्या विरुद्धार्थी म्हण कोणती?
पुढे काही समानार्थी शब्दांचे गट दिलेले आहेत. त्यापैकी चुकीचा गट कोणता, ते सांगा.
खाली दिलेल्या विधानातून चुकीचे विधान ओळखा व त्याचा अचूक पर्याय लिहा.
अ. जे शब्द संस्कृतच्या मूळ रूपात बदल न होता मराठीत आले आहेत, ते शब्द तद्भव होत. उदाः हात
ब. त्त् + सम = तत्सम म्हणजे संस्कृतमधील मूळ रूपात काहीही फरक न पडता जसेच्या तसे येतात, त्यास तत्सम शब्द म्हणतात.
क. 'चाक' या संस्कृत शब्दापासून 'चक्र' हा मराठी शब्द आलेला आहे.
योग्य जोड्या जुळवा:
'अ' गट: (क) पाणी पडणे, (ख) पाणी पाजणे, (ग) पाणी सोडणे, (घ) पाणी मुरणे
'ब' गट: (i) खूप चोप देणे, (ii) वाया जाणे, (iii) दोषाला जागा असणे, (iv) त्याग करणे
नाचणारा, वाकलेला व जळता हे शब्द वाक्यात विशेषण म्हणून वापरल्यास ते कोणत्या प्रकारचे विशेषण होईल ?
पुढील ओवीतील अलंकार ओळखा.
गगन राज्य अफाट तथा रवी
उगरूनी नुपती बहुतोषवी
म्हणून पक्षीच भाट सुखावले
करिती गायन ही स्तुती भासले
पुढील पर्यायात जोड्या दिलेल्या आहेत, त्यापैकी चुकीची जोडी नसलेला पर्याय कोणता ?
खाली दिलेल्या दोन शब्दांच्या एकत्रीकरणातून तयार होणारा जोडशब्द ओळखा.वधू+आगमन=?
पुढील विधान वाचा : 'मी प्रेम करीत राहीन' या रीतिभूतकाळी वाक्याचे अपूर्ण भविष्यकाळी रूप असलेला पर्याय निवडा.
पुढील वाक्ये वाचा :
अ. आंधळ्याला आरश्याचा काय उपयोग ?
ब. लबाडाचं आमंत्रण जेवल्यावर खरं.
या दोन्ही वाक्यातील नामाचा प्रकार कोणता ?