LIVE All Exams Ongoing Admit Cards Out
Suchana.
UPDATES
Advertisement
728 × 90 — LeaderboardPlace AdSense responsive leaderboard unit here
Previous Year Paper
MPSC Group B (Non-Gazetted) Question Paper 2026 Released: Prelims Paper with Detailed Solutions & Official Answer Key
14 Jun 2026
5 min read
1. खालील माहीतीवरून समाजसुधारक ओळखा.
a. ते एलफिन्स्टन कॉलेजमध्ये असिस्टंट प्रोफेसर होते.
b. त्यांनी इ. स. 1840 मध्ये दिग्दर्शन नावाचे पहीले मराठी मासीक सुरू केले.
c. ब्रिटीश सरकारने त्यांची 1840 मध्ये 'जस्टीस ऑफ द पीस' म्हणून नेमणूक केली.
Identify the social reformer from the following information.
a. He was an Assistant Professor at Elphinstone College.
b. He started the first Marathi magazine named Digdarshan in 1840 A. D.
c. The British Government appointed him as the 'Justice of the Peace' in 1840.

2. इ. स. 1916 मध्ये, महर्षी धोंडो केशव कर्वे यांचा महिला विद्यापीठ स्थापनेमागील उद्देश कोणता होता ?
अ. स्त्रियांना उच्च शिक्षण देणे.
ब. स्त्रियांना गायनकलेचे शिक्षण देणे.
क. स्त्रियांना स्वावलंबी बनविणे.
What was the purpose of Maharshi Dhondo Keshav Karve behind establishing women's university in 1916 A. D. ?
a. Providing higher education to women.
b. Teaching singing to women.
c. Making women self-reliant.

3. वसाहतवादामुळे भारतात खालीलप्रमाणे कोणते परिवर्तन घडून आले ?
अ. राष्ट्रवादाची भावना वाढीस लागली
ब. मध्ययुगीन राजवटींचा शेवट झाला
क. भारतात नागरीकरणाचा वेग वाढला
ड. देशी उद्योगधंद्यात वाढ झाली
Which of the following changes took place in India due to colonialism?
a. Growth of Nationalism
b. End of Medieval Reign
c. Growth of Urbanisation in India
d. Growth in Indigenous Industry

4. "येथील लोक केवळ शिक्षण घेऊन स्वस्थ बसणार नाहीत, राज्यकारभारात वाटा देऊनही ते संतुष्ट होणार नाहीत; किंबहुना सर्वच राज्यकारभारावर आपला हक्क प्रस्थापित करू पाहतील" असे _______ यांनी _______ यांना पाठविलेल्या पत्रात म्हटले होते. "The people here will not be satisfied with just getting an education, they will not be satisfied with a share in the governance. In fact they will try to establish their right to all the governance" said _______ in a letter sent to _______.

5. पुढील कोणते विधान चुकीचे आहे ?
अ. भगत सिंह व राजगुरु यांनी साँडर्स या ब्रिटिश अधिकाऱ्याची हत्या केली.
ब. नाशिकचा जिल्हाधिकारी जॅक्सनची हत्या अनंत लक्ष्मण कान्हेरे यांनी केली.
क. मुंबईचा कमिशनर रँड याची हत्या चाफेकरांनी केली.
Which of the following statement is incorrect?
a. Bhagat Singh and Rajguru assassinated British Officer Saunders.
b. Anant Laxman Kanhere assassinated Jackson, the District Collector of Nashik.
c. Chaphekar assassinated Rand, the Commissioner of Mumbai.

6. 1909 च्या मोर्ले-मिन्टो सुधारणा कायद्याबद्दल "हे शुद्ध टोणग्याचे आचळ ठरतील यातून लोकहिताचे दूध मिळणे शक्य नाही", अशी प्रतिक्रिया खालीलपैकी कोणी दिली ? Who among the following commented on the Morley-Minto Reforms Act of 1909 that, "This is useless like the udder of a bull; one can never milk it for getting the milk of public welfare"?

7. 1857 च्या बंडाबाबत, "बंडवाल्यांना एक जरी समर्थ नेता मिळाला असता तरी भारतावरील इंग्रजांचे राज्य नष्ट झाले असते." हे विधान कोणी केले ? Who made the statement, "If the uprising had even one capable leader, British rule over India would have been destroyed", regarding the 1857 uprising?

8. लोकमान्य टिळकांनी बेत रायफली व काडतूसे बनविण्याचे शिक्षण घेण्यासाठी _______ यांना नेपाळ येथे पाठविले होते. Lokmanya Tilak sent _______ to Nepal to learn how to make rifles and cartridges.

9. ना. गोपाळ कृष्ण गोखलेंच्या कार्याबाबत खालील विधाने वाचुन अचूक पर्यायांची निवड करा.
अ. 1887 मध्ये ते सार्वजनिक सभेचे चिटणीस होते.
ब. पुणे सार्वजनिक सभेच्या त्रैमासिकाचे ते संपादक होते.
क. 1900 साली ते केंद्रिय कायदेमंडळाचे सदस्य झाले.
ड. 1895 साली त्यांची भारतीय राष्ट्र सभेच्या (काँग्रेस) चिटणीस पदी निवड झाली.
Read the following statements and select the correct option about the work of Hon. Gopal Krishna Gokhale.
A. He was the Secretary of Sarvajanik Sabha in 1887.
B. He was the Editor of Pune Sarvajanik Sabha quarterly.
C. He was the member of Central Legislative Council in 1900.
D. He was elected as Secretary of Indian National Congress in 1895.

10. 31 ऑक्टोबर 1920 रोजी मुंबईत लाला लजपत राय यांच्या अध्यक्षतेखाली ऑल इंडिया ट्रेड युनियन काँग्रेसचे पहिले अधिवेशन भरले. या अधिवेशनाला खालीलपैकी कोण हजर नव्हते ?
अ. मोतीलाल नेहरू
ब. अवंतिकाबाई गोखले
क. महात्मा गांधी
ड. विठ्ठलभाई पटेल
On October 31, 1920, the first session of the All India Trade Union Congress was held in Mumbai under the Presidency of Lala Lajpat Rai. Who among the following was not present at this session?
a. Motilal Nehru
b. Avantikabai Gokhale
c. Mahatma Gandhi
d. Vitthalbhai Patel

11. कोकण किनारपट्टीचा जो भाग अरबी समुद्राच्या किनाऱ्यालगत सखल सपाट भूरचनेचा आहे त्यास _______ नावाने ओळखले जाते. The part of the Konkan coast that is of low-lying, flat topography along the shores of the Arabian Sea is known as _______

12. डॉ बाळासाहेब सावंत कोकण कृषी विद्यापिठाने संशोधित केलेले आंब्याचे वाण आणि विकसित केल्याचे वर्ष यांच्या योग्य जोड्या लावा.
वाण - विकसित केल्याचे वर्ष
A. रत्ना - 1981
B. सिंधू - 1992
C. कोकण रूची - 1999
D. कोकण सम्राट - 2014
Match the Mango varieties developed by Dr. Balasaheb Sawant Konkan Krishi Vidyapeeth with their release year.

13. महाराष्ट्राच्या संदर्भातील खालील विधानांवरून जिल्हा ओळखा.
अ. तलावांचे शहर या जिल्ह्यात स्थित आहे.
ब. या जिल्ह्यात दारूगोळा व शस्त्रनिर्मितीचा कारखाना आहे.
क. एक तालुका धातुच्या वस्तु व त्यावरील नक्षीकाम यासाठी प्रसिद्ध आहे.
ड. मुशी जातीचे गवत या जिल्ह्यात मोठ्या प्रमाणात आढळते.
Identify the district from the following statements regarding Maharashtra.
a. The city of lakes is located in this district.
b. There is an ammunition and weapons manufacturing factory in this district.
c. A Tehsil is famous for its metal objects and carvings on them.
d. Mushi grass is found in large quantities in this district.

14. महाराष्ट्राच्या ईशान्य भागात खालीलपैकी कोणत्या डोंगर रांगा / टेकड्या स्थित आहेत ?
अ. सातमाळा
ब. गाळणा
क. अक्रानी
ड. दरकेसा
Which of the following mountain ranges/hills are located in the north-eastern part of Maharashtra?
a. Satmala
b. Galna
c. Akrani
d. Darkesa

15. खालीलपैकी कोणती /त्या जोडी/ड्या अयोग्य आहेत ?
प्रशासकीय विभाग/जलिहा - तलाव /जलाशय
अ. छत्रपती संभाजी नगर - धाराशिव - तावरजा
ब. नागपूर - भंडारा - उमरझरी
क. अमरावती - वाशिम - चिखली
ड. कोकण - सिंधूदुर्ग - शिवडाव
Which of the following pair/s is/are incorrect?
Administrative Division/District - Lake/Reservoir
A. Ch. Sambhaji Nagar - Dharashiv - Tavraja
B. Nagpur - Bhandara - Umarzari
C. Amravati - Washim - Chikhali
D. Konkan - Sindhudurg - Shivdav

16. पुढील नद्या व उपनद्यांच्या योग्य जोड्या लावा.
नद्या - उपनद्या
a. तापी - बोरी
b. पूर्णा - नळगंगा
c. सिंदफणा - बिंदुसरा
d. मांजरा - घरणी
Match the following correct pairs of rivers and tributaries.

17. सियाचीन लडाखमधील कोणती हिमनदी श्योक नदीमध्ये वहाते ? Which glacier in Siachen Ladakh drains into the river Shyok?

18. खालील विधानांचा विचार करा.
अ. 2001 वे 2011 या काळात महाराष्ट्रात लोकसंख्या वाढीचा दर 15.99 टक्के होता.
ब. 2011 च्या जनगणनेनुसार महाराष्ट्र राज्यातील 122372972 लोकसंख्येपैकी मुस्लीम लोकसंख्या 10.6 टक्के होती.
क. 2011 च्या जनगणनेनुसार केरळ राज्यात सर्वाधिक कृषी घनता आढळली.
ड. 2011 च्या जनगणनेनुसार 0-6 वयोगटातील बाल लिंग गुणोत्तरात अव्वल दहा राज्ये सिक्कीम, अरुणाचल प्रदेश, जम्मु आणि काश्मिर, छत्तीसगड़, मणिपुर, नागालैन्ड, राजस्थान, मध्यप्रदेश इत्यादी आहेत.
Consider the following statements:
a. Decadal growth of population from 2001 to 2011 in Maharashtra was 15.99 per cent.
b. As per 2011 census Muslim population concentration in Maharashtra was 10.6 per cent out of 122372972 total population.
c. The highest agricultural density was found in Kerala State as per 2011 census.
d. As per 2011 census, top ten States in child sex ratio in the age group 0-6 are Sikkim, Arunachal Pradesh, Jammu and Kashmir, Chhattisgarh, Manipur, Nagaland, Rajasthan, Madhya Pradesh etc.

19. खालीलपैकी कोणती जोड़ी 'शहरी एकत्रिकरण' या संकल्पनेत येते ? Which of the following pair comes under the concept of 'urban agglomeration'?

20. उत्तर महाराष्ट्रातील 150 मेगावॅटचा सौरउर्जा प्रकल्प कोणत्या जिल्ह्यात आहे ? In which district of North Maharashtra, the 150 MW solar power project is located?

21. प्राथमिक तूट म्हणजे काय ? What is primary deficit ?

22. लेखा शास्त्रात लेखा या शब्दाचा नेमका अर्थ काय दर्शवितो ? What does the term accounting actually mean in accountancy?

23. वर्ष 2023-24 च्या अर्थसंकल्पात मांडलेल्या सात प्राधान्य क्षेत्र अर्थात् 'सप्तर्षी' पैकी खालीलपैकी कोणते क्षेत्र सप्तर्षीचा भाग नाही ? Which of the following is not a part of seven priorities termed as 'Saptarshi' in union budget 2023-24?

24. खालील विधाने विचारात घ्या.
अ. राष्ट्रीय उत्पन्न ही एक साठा संकल्पना आहे.
ब. स्थूल राष्ट्रीय उत्पन्नातून घसारा वजा केल्यास जी राष्ट्रीय उत्पन्नाची रक्कम मिळते तिला निव्वळ राष्ट्रीय उत्पन्न असे म्हणतात.
क. राष्ट्रीय उत्पन्नाचे मोजमाप करताना वस्तु व सेवांच्या उत्पादनाचे दुहेरी मोजमाप टाळले जाते.
वरीलपैकी कोणते/कोणती विधान / विधाने बरोबर आहे/आहेत ?
Consider the following statements.
a. National income is a stock concept.
b. The amount of national income after deducting depreciation from gross national income is called net national income.
c. Double measurement of output of goods and services is avoided while measuring national income.
Which of the above statement(s) is/are correct?

25. खालील विधाने विचारात घ्या.
अ. 2023-24 या कालावधीत औद्योगिक उत्पादनाच्या निर्देशांकानुसार औद्योगिक उत्पादन 5.8 टक्क्यांनी वाढले आहे.
ब. कोळसा उत्पादनाच्या विस्तारामुळे 2023-24 मध्ये खाण क्षेत्राच्या निर्देशांकाने वर्षभरात 13 टक्के वाढ नोंदविली.
वरीलपैकी कोणते/ती विधान/ने बरोबर आहे/त ?
Consider the following statements.
a. Industrial output as measured by the index of industrial production expanded by 5.8 percent during 2023-24.
b. The mining sector index recorded 13 percent year over year growth in 2023-24, led by expansion in coal production.
Which of the statements given above is/are correct?

26. पुढील विधानांचा विचार करा व योग्य पर्याय निवडा.
विधान । : ग्रामीण युवकांना स्वयंरोजगारासाठी प्रशिक्षण देणारी (TRYSEM) योजना 15 ऑगस्ट 1979 पासून सुरू करण्यात आली.
विधान ॥ : राष्ट्रीय ग्रामीण रोजगार कार्यक्रम 1990 पासून सुरू करण्यात आला.
Consider the following statements and choose the correct option.
Statement I: Training of Rural Youth for Self-Employment (TRYSEM) scheme was started from 15th15^{\text{th}} August 1979.
Statement II: National Rural Employment Program was launched from 1990 onwards.

27. डॉ. एस. महेंद्र देव आणि सी. रवी यांनी दारिद्र्यरेषेखालील लोकसंख्येची गणना या खर्चाच्या आधारे करण्याचा प्रयत्न केला आहे.
अ. कपडे
ब. आरोग्य
क. ऊर्जा उपभोग
ड. शिक्षण
Dr. S. Mahendra Dev and C. Ravi have attempted to calculate population below poverty line on the basis of expenditure on
a. Clothing
b. Health
c. Energy consumption
d. Education

28. 'लोकसंख्येचा लाभांश' या संकल्पनेत लाभांश काय आहे ? What is dividend in the concept of demographic dividend ?

29. अर्थसंकल्पातील विकासेतर खर्चामधे खालीलपैकी कशाचा समावेश होतो ?
a. पेन्शन
b. व्याजाची परतफेड
c. शिक्षण
d. प्रशासकीय सेवा
Which of the following includes non-development expenditure in budget ?
a. Pension
b. Interest payment
c. Education
d. Administrative services

30. बहुराष्ट्रीय कंपन्यांच्या विस्ताराबाबत आणि व्यापारी डावपेचांबाबत योग्य विधान/विधाने कोणती ?
a. बहुराष्ट्रीय कंपन्या या बलाढ्य संस्था असून त्या शाखा विस्तारा द्वारे जगभर जाळे पसरवतात.
b. बहुराष्ट्रीय कंपन्या या एकाच प्रकारच्या उत्पादनात विशेषीकरण करून नफा कमावतात.
c. बहुराष्ट्रीय कंपन्यांचा विस्तार विकसनशील देशात जास्त आहे.
d. बहुराष्ट्रीय कंपन्या नवीन उत्पादनांच्या संशोधन आणि विकासावर खूप भर देतात.
Which of the following sentence/sentences are correct regarding the extension and commercial strategies of Multinational Corporations (MNC's)?
a. Multinational companies are huge institutions which extends global network through branch expansion.
b. MNC's earns profit with specialization in one product.
c. Expansion of MNC's is more in developing nations.
d. MNC's gives emphasis on the research and development of new products.

31. सरकारी बँक या नात्याने भारतीय रिझर्व बँक विविध कामे पार पाडते. खालीलपैकी कोणत्या कामाचा त्यान समावेश होत नाही ? Reserve Bank of India performs many functions but which of the following is not among them?

32. शिक्षणातील लैंगिक समता निर्देशांक (GPI) संदर्भात त्याची प्रमाणित गणना पद्धत खालीलपैकी कोणती आहे ? With reference to the Gender Parity Index (GPI) in education, which of the following best describes its standard method of calculation?

33. भारतीय अर्थव्यवस्थेतील, 2004-05 नंतर दिसून येणारा मोठा बदल म्हणजे भारतीय शेतीतील कमी होत जाणारी शेतमजुरांची संख्या. याला कोणत्या प्रकारचा बदल म्हणता येईल ? In Indian Economy, after 2004-05, number of workers in Indian agriculture are declining. What type of change it is ?

34. मौद्रिक धोरणाच्या संख्यात्मक साधनांची त्याच्या संबंधित उद्धिष्टांशी जुळणी करा.
Quantitative measures - Objectives
अ. बँकदर (Bank rate) - i. RBI कडे ठराविक किमान रक्कम राखीव ठेवणे (Maintaining certain minimum reserves with RBI)
ब. रोख राखीव गुणोत्तर (Cash reserve ratio) - ii. RBI द्वारे पात्र रोख्यांची खरेदी-विक्री (Buying and selling eligible securities by RBI)
क. वैधानिक रोखता प्रमाण (Statutory liquidity ratio) - iii. पुनर्वटन दर (Rediscount rate)
ड. खुल्या बाजारातील उलाढाल (Open market operation) - iv. RBI कडे रोख, सोने आणि रोख्यांच्या स्वरूपात तरल मालमत्ता ठेवणे (Maintaining liquid assets in the form of cash, gold and securities with RBI)
Match the quantitative measures of monetary policy with its corresponding objectives.

35. भारतात राष्ट्रीय उत्पन्नाचे मापन करतांना कोणत्या मर्यादा/अडचणी निर्माण होतात ?
अ. उत्पन्न वाटणीच्या आकडेवारीचा अभाव.
ब. न नोंदवीलेले बेकायदेशीर उत्पन्न.
क. मौद्रिक क्षेत्राचे उत्पादन.
ड. लहान उत्पादकांच्या उत्पन्नाविषयी सांख्यिकी उपलब्ध नसणे.
Which limitations/difficulties arise in National Income estimation in India?
a. Absence of data on income distribution.
b. Unreported illegal income.
c. The output of monetised sector.
d. Non availability of data about income of small producers.

36. भारताताल 2024 च्या सार्वत्रिक निवडणुकीमध्ये निवडणुक लढणाऱ्या महिला उमेदवारांची एकूण संख्या _______ आहे. The total number of women candidates who contested in the 2024 General Elections in India is

37. लेगो (LEGO) ही खेळणी बनवणारी कंपनी आहे. तिचे कार्यक्षेत्र जगभरात विस्तारले आहे. ती मूळची _______ या देशातील आहे. LEGO is a toy company, having worldwide operations, which is originally from

38. खालीलपैकी योग्य कथन/ने ओळखा :
अ. मनोहर जोशी व पंकज उधास यांना पद्मभूषण पुरस्कार 2025 ने सन्मानित करण्यात आले.
ब. अच्युत पालव व अशोक सराफ यांना पद्मश्री पुरस्कार, 2025 ने सन्मानित करण्यात आले.
Select the correct statements from the following:
A. Manohar Joshi and Pankaj Udhas were honoured by Padma Bhushan Award, 2025.
B. Achyut Palav and Ashok Saraf were honoured by Padma Shree Award, 2025.

39. दुष्काळ सहन करणारी _______ जात सादर करण्याच्या यशस्वी प्रयत्नांसाठी डॉ. स्वाती नायक यांना प्रतिष्ठित नॉर्मन बोरलॉग पुरस्काराने सन्मानिन करण्यात आले. Dr. Swati Nayak was awarded the prestigious Norman Borlaug Award for her successful efforts in introducing the _______ which is a drought tolerant variety.

40. 17 व्या ब्रिक्स शिखर परिषद, 2025 मध्ये लक्ष केंद्रीत केलेले विषय :
अ. जागतिक प्रशासन संस्थामध्ये सुधारणा
ब. बहुपक्षीयतेला प्रोत्साहन देणे
क. सामाजिक विषमतेला संबोधित करणे
ड. AI च्या नियंत्रणासाठी समावेशक चौकट प्रस्थापित करणे
The 17th BRICS Summit 2025 focused on:
A. Reforming global governance institutions
B. Promoting multi-lateralism
C. Addressing social inequality
D. Establishing inclusive frameworks for AI governance

41. खालीलपैकी योग्य कथने ओळखा (UNV बाबत) :
अ. 2024 मध्ये UNV ने जगभरात 14,500 हून अधिक स्वयंसेवक तैनात केले.
ब. 2026 हे वर्ष संयुक्त राष्ट्रांनी आंतरराष्ट्रीय स्वयंसेवक वर्ष म्हणून घोषित केले आहे.
क. स्वयंसेवक हे विविध भूमिकांमध्ये कार्य शकतात, त्यामध्ये समुदाय विकास, मानवी हक्क, शांतता निर्मिती इ. समाविष्ट आहे.
Select the correct statements from the following (UNV):
A. In 2024, UNV deployed over 14,500 volunteers across the world.
B. 2026 has been designated by the UN as the International year of volunteers.
C. Volunteers serve in diverse roles including community development, human rights, peace building etc.

42. महाराष्ट्र भूषण पुरस्कार विजेत्यांचा क्रम पुरस्कार मिळालेल्या वर्षानुसार चढत्या क्रमाने लावा. (सर्वात जुना पहिल्यांदा व सर्वात नवीन शेवटी)
अ. राम सुतार
ब. आप्पासाहेब धर्माधिकारी
क. अशोक सराफ
ड. आशा भोसले
Arrange the Maharashtra Bhushan Award recipients in an appropriate order - (Ascending order) if the year in which they got the prize, oldest first and newest last.

43. खानमिगो हे _______ या क्षेत्राशी संबंधीत असलेले कृत्रिम बुद्धीमत्तेवर आधारित अॅप आहे. Khanmigo is an artificial intelligence app related to the field of

44. खालीलपैकी काय मणजे उभ्या शेतीचा (व्हर्टीकल फार्मीग) फायदा नाही ? Which of the following is not an advantage of vertical farming ?

45. _______ यांनी एप्रिल 2024 मध्ये अधिकृतपणे आयर्लंडचे सर्वात तरुण पंतप्रधान म्हणून डब्लिनमध्ये पदभार स्वीकारला. _______ become the youngest ever Prime Minister of Ireland, officially took office in Dublin in April 2024.

46. खालीलपैकी कोणाला 'जंगलाचा विश्वकोश' (एन्सायक्लोपिडिया ऑफ द फॉरेस्ट) म्हणून ओळखले जाते ? Who among the following is known as 'Encyclopaedia of the forest' ?

47. खालीलपैकी कोणत्या सरकारी संस्थेने नवी दिल्ली येथे 'दहशतवाद विरोधी परिषद-2024' आयोजित केली होती ? Which of the following government agency organized the 'Anti-terror Conference-2024' in New Delhi ?

48. 'बेटी बचाव बेटी पढाओ' योजनेचा उद्देश काय आहे ? 'Beti Bachao Beti Padhao' scheme aims at

49. "मिशन शक्ती" योजना _______ संबंधित आहे. "Mission Shakti" is related to

50. _______ एक पायलट, वैमानिक आणि उद्योजक हे अॅमेझॉनचे संस्थापक जेफ बेझोस यांच्या ब्लू ओरिजनच्या NS-25 मोहिमेत परदेशी पर्यटक म्हणून अंतराळात जाणारे पहिले भारतीय नागरिक बनले. _______ a pilot, aviator and an entrepreneur, become the first Indian civilian to venture into space as a tourist Abroad Amazon founder Jeff Bezos' Blue Origin NS-25 mission.

51. भारतीय राज्यघटनेतील कोणत्या कलमानुसार प्रत्येक घटक राज्यात विधानसभा निर्माण केलेली आहे ? According to which Article in the Constitution of India, Legislative Assembly is constituted in each Constituent State ?

52. उपलेखापरिक्षकाने एका वर्षात लेखा तपासणी करावयाच्या शंभर ग्रामपंचायतीपैकी किमान किती ग्राम पंचायती मुख्य पंचायती असणे अगत्याचे असते ? Out of one hundred Gram Panchayats to be audited by the Deputy Auditor in a year, at least how many Gram Panchayats should be the main panchayats ?

53. खालीलपैकी कोणती घटनादुरुस्ती ही शहरी भागातील स्थानीक स्वराज्य संस्थांशी संबंधीत आहे ? Which of the following Constitutional Amendments is related to urban local self-government?

54. खालील पर्यायापैकी कोणते न्यायालय अभिलेख न्यायालय आहे ? Which of the following Courts is a Court of record ?

55. ग्रामपंचायत खालीलपैकी कोणते शुल्क वसूल करू शकते ? Which fee can be collected by Gram Panchayat ?

56. भारतीय संविधानाच्या 12 व्या अनुसूचीमध्ये नगरपालिकांसाठी खालीलपैकी कोणते कार्य निश्चित केले आहे ?
अ. शहरी दारिद्रय निर्मूलन
ब. आर्थिक आणि सामाजिक विकासासाठी नियोजन
क. चर्मसंस्करणीचे (चर्मोदयोग कारखान्यांचे) नियमन
ड. शहरी वनीकरण
Which of the following functions have been laid down in the 12th Schedule of the Constitution of India for the Municipalities?
A. Urban poverty alleviation
B. Planning for economic and social development
C. Regulation of tanneries
D. Urban forestry

57. खालीलपैकी योग्य कथन/ने ओळखा.
अ. संविधानाच्या अनुच्छेद 368 अंतर्गत उद्देश पत्रिके मध्ये दुरुस्ती करता येते काय ? हा प्रश्न ऐतिहासिक केशवानंद भारती खटल्यात (1973) पहिल्यांदा उपस्थित झाला.
ब. सप्टेंबर 2025 पर्यंत 42 व्या घटना दुरुस्ती कायद्याद्वारे 1976 मध्ये फक्त एकदाच उद्देश पत्रिकेत दुरुस्ती करण्यात आली.
Select the correct statement/s from the following.
A. The question as to whether the preamble can be amended under Article 368 of the Constitution arose for the first time in the historic Keshavananda Bharti Case (1973).
B. The Preamble has been amended only once in 1976 by the 42nd Constitutional Amendment Act, as of September 2025.

58. केंद्र-राज्यांच्या प्रशासकीय संबंधांच्या संदर्भातील जोड्या जुळवा.
कलम - तरतूद
A. 256 - i. काही प्रकरणांमध्ये राज्यांवर केंद्राचे नियंत्रण (Control of the Union over States in certain cases)
B. 257 - ii. राज्ये आणि केंद्राचे दायित्व (Obligation of States and the Union)
C. 258-A - iii. भारता बाहेरील प्रदेशांच्या संबंधात केंद्राचे अधिकारक्षेत्र (Jurisdiction of the Union in relation to territories outside India)
D. 260 - iv. केंद्राकडे कार्ये सोपविण्याचा राज्यांचा अधिकार (Power of the States to entrust functions to the union)
Match the pairs regarding Centre - State Administrative relations.

59. खालीलपैकी कोणते तत्व भारतीय राज्यघटनेतील राज्य धोरणाच्या मार्गदर्शक तत्वाचा भाग नाही ? Which of the following principle is not a part of Directive Principles of the State Policy stated in the Constitution of India?

60. राज्य लोकसेवा आयोगाच्या सदस्याला काढून टाकता येते : A member of the State Public Service Commission may be removed by

61. भारतीय संविधानाच्या सरनाम्याची सुरुवात, "आम्ही भारतीय लोक" अशी आहे. खालीलपैकी कोणत्या देशाच्या संविधानाच्या सरनाम्यातही अशीच सुरुवात आढळते ? The Preamble of the Indian Constitution, begins with words, "We the people of India". The Preamble of the Constitution of which of the following country also begins with the same phrase?

62. सरपंच किंवा उप-सरपंच याच्या विरुद्ध अविश्वासाचा ठराव मांडण्यापूर्वी किमान एक तृतीयांश सभासदांच्या सहीने तश्या प्रस्तावाची सुचना कोणाला द्यावी लागते ? Before passing a resolution of no confidence against the Sarpanch or the Deputy-Sarpanch, at least one-third of the members have to give notice with signature of such motion to whom?

63. राज्य धोरणाच्या मार्गदर्शक तत्वांबाबत खालीलपैकी योग्य कथने ओळखा.
अ. ती गैर-न्यायप्रविष्ट आहेत (न्यायप्रविष्ट नाहीत).
ब. त्यांना नैतिक व राजकीय आधार आहेत.
क. ती समूहाच्या कल्याणाला प्रोत्साहन देतात.
ड. त्यांच्या अंमलबजावणीसाठी कायदे आवश्यक आहेत.
State the correct statements from the following about the Directive Principles of State Policy.
A. These are non-justiciable.
B. These have moral and political sanctions.
C. They promote the welfare of the community.
D. They require legislation for their implementation.

64. खालीलपैकी काय भारतीय संविधानाच्या कलम 23 मध्ये समाविष्ट नाही ? Which of the following is not included in Article 23 of the Indian Constitution?

65. 1947 च्या भारतीय स्वातंत्र्य कायद्याने संविधान सभेच्या स्थितीत बदल केले :
अ. या कायद्याने संविधान सभेला ब्रिटिश संसदेने भारता संदर्भात केलेला कोणताही कायदा रद्द करण्याचा किंवा बदलण्याचा अधिकार दिला.
ब. संविधान सभा ही एक विधिमंडळ संस्था देखील बनली.
क. सर्वसाधारण परिस्थितीत जेव्हा संविधान सभा ही संविधान संस्था म्हणून आणि विधिमंडळ संस्था म्हणून कार्य करीत असे, तेव्हा तिचे अध्यक्षपद डॉ. राजेंद्र प्रसाद यांच्याकडे असे.
The Indian Independence Act of 1947 made the changes in the position of the Constituent Assembly:
A. The Act empowered the Constituent Assembly to abrogate or alter any law made by the British Parliament in relation to India.
B. The Constituent Assembly also became a Legislative Body.
C. Normally Constituent Assembly was Chaired by Dr. Rajendra Prasad when it met as Constituent as well as Legislative Body.

66. योग्य उत्तर निवडा.
i. क्ष-किरण हे श्राव्यातीत/अल्ट्रासोनिक लहरी आहेत.
ii. क्ष-किरण सरळ रेषेत प्रवास करतात.
iii. सॉफ्ट क्ष-किरण ची तरंग लांबी हार्ड क्ष-किरणापेक्षा कमी असते.
iv. क्ष-किरणांचा वेग हा प्रकाशाच्या वेगापेक्षा कमी असतो.
Choose the right answer.
i. X-rays are ultrasonic waves.
ii. X-rays travel in a straight lines.
iii. Soft X-rays have less wavelength than hard X-rays.
iv. Speed of X-ray is less than speed of light.

67. ध्वनी उर्जा म्हणजे : Sound energy is the :

68. खालील विधाने सत्य की असत्य ते लिहा.
i. विखंडन (fission) अभिक्रियेमध्ये जड युरेनियम अणु वापरतात.
ii. विखंडन (fission) अभिक्रियेमध्ये खूप उर्जा बाहेर पडते.
iii. विखंडन अभिक्रियेमध्ये जड अणु विभागतात.
iv. विखंडन अभिक्रियेमध्ये न्युट्रान्समुळे श्रृंखला अभिक्रिया घडते.
Say whether it is true or false.
i. In fission reaction heavy uranium atoms are used.
ii. Fission reaction releases large amount of energy.
iii. In fission heavy atom splits.
iv. In fission reaction due to neutrons chain reaction occurs.

69. 92U238_{92}\text{U}^{238} च्या अणूमध्ये किती न्यूट्रॉन्स असतात ?
अ. 92
ब. 238
क. 330
ड. 184
How many neutrons are there in an atom of 92U238_{92}\text{U}^{238}?
a. 92
b. 238
c. 330
d. 184

70. हॅमेटाईट पासून कोणता धातू मिळवला जातो ? Which metal can be obtained from Haematite?

71. खालीलपैकी कोणते मुलद्रव्य आवर्तसारणी मधील 'पी' गणात समावेश आहे ? Which of the following element belong to 'p' block in the modern periodic table ?

72. खालीलपैकी कोणता कोएलेंटेरेटा फायलमशी संबंधित नाही ? Which of the following does not belong to phylum coelenterata ?

73. डिप्लोडोकस् कोणत्या सब-ऑर्डरशी संबंधित आहे ? Diplodocus belongs to which suborder ?

74. खालीलपैकी कोणते उभयचर प्राणी आंधळे आहेत ? Which one of the following amphibians are blind?

75. _______ वनस्पतीच्या जोमदार वाढीसाठी सर्वोत्तम मृदा/माती आहे. _______ is considered the best soil for vigorous plant growth.

76. मातीचा/मृदेचा उपजाऊ स्तरांच्या नुकसानीस _______ म्हणतात. The loss of upper fertile layer of soil is known as _______

77. लिंबू वरील कँकर रोग _______ या रोगकारका मुळे होतो. Citrus canker disease is caused by _______ causal agent.

78. खालीलपैकी कोणती कोणती जीवनसत्त्वे पाण्यात विद्राव्य आहेत ? Which of the following are water-soluble vitamins?

79. प्रमस्तिष्कमेरू द्रव हा मेंदूच्या पोकळीतील कोरॉईड प्लेक्सस् मध्ये तयार झालेला व सबॲराक्नाईड पोकळीमधून मेंदू व मज्जारज्जू सभोवती फिरणारा द्रव पदार्थ आहे. याबाबतीत खालील विधाने विचारार्थ घ्या.
अ. मेंदूला प्राणवायू (ऑक्सीजन) पुरवण्याचे तो माध्यम आहे.
ब. तो टाकावू पदार्थ दूर वाहून नेतो.
क. तो मेंदूला पोषण पुरवितो.
ड. तो, मेंदू व मज्जारज्जू साठी आघातप्रतिबंधक म्हणून काम करतो.
The cerebro-spinal fluid is secretion produced by the choroid plexuses and circulating in sub-arachnoid space around the brain and spinal cord. Consider the following sentences in this regard.
A. It is medium by which oxygen is supplied to brain.
B. It carries away waste products.
C. It supplies nourishment to brain.
D. It acts as buffer protecting brain and spinal cord.

80. मानवाच्या शरीरामध्ये, पाण्याच्या संतुलनाचे नियंत्रण, रक्तातील क्षारांच्या प्रमाणाचे नियंत्रण, रक्ताच्या सामूचे (pH) नियंत्रण, टाकावू पदार्थांचे व अतिरिक्त क्षारांचे शरीराबाहेर उत्सर्जन इ. कार्ये प्रामुख्याने _______ करते. In human body, regulation of water balance, regulation of concentration of salts in the blood, regulation of pH of the blood, excretion of the waste products and excess of salts etc. functions are performed mainly by

81. एका आयताकृती पट्टीची मोठी बाजू 40 से.मी. आहे व कर्ण त्यापेक्षा 1 से.मी. ने मोठा आहे. त्या पट्टीची परिमिती किती ? A rectangular strip has larger side 40 cm and diagonal 1cm more than it. What is perimeter of that strip ?

82. दोन संख्या 5:7 या प्रमाणात आहे. जर दोन्ही संख्यांमधे 12 मिळविले तर त्याचे प्रमाण 7: 9 होते. मूळ दोन संख्यांमधील फरक किती आहे ? What is the difference between two numbers if they are in the ratio 5: 7 and when 12 is added to both numbers, the ratio between them becomes 7: 9?

83. दोन व्यक्ती एक काम एकत्रितपणे 24 तासात पूर्ण करू शकतात. जर त्यांच्यातील वेगाने काम करणारी व्यक्ती दुसऱ्या व्यक्तीपेक्षा 3 पट वेगाने काम करत असेल तर फक्त वेगाने काम करणारी व्यक्ती ते काम किती वेळात पूर्ण करेल ? Two persons together complete a work in 24 hours. If one of them is 3 times faster than the other, how much time will be required to complete that work by only the person who is faster than the other?

84. रणधिर जवळ 10,000 रुपये होते. त्यापैकी काही रक्कम तो स्कीम A मध्ये 5% द.सा.द.शे. सरळ व्याज दराने गुंतवितो तर उर्वरीत रक्कम स्कीम B मध्ये 8% द.सा.द.शे. सरळ व्याज दराने गुंतवितो. जर त्याला एक वर्षानंतर 710 रुपये व्याज मिळाले तर त्याने स्कीम B मध्ये किती गुंतवणूक केली ? Out of Rs. 10,000, Randhir invests some amount in scheme A at 5% p. a. simple interest and invests remaining amount in scheme B at 8% p. a. simple interest. After one year, he earns a total interest of Rs. 710. How much did he invest in scheme B?

85. जर एका आयताची लांबी 40% नी वाढवली. तर आयताचे क्षेत्रफळ तेवढेच राहण्यासाठी आयताची रुंदी किती टक्क्यांनी कमी करावी लागेल ? The length of a rectangle is increased by 40%. By what percent would the breadth of rectangle have to be decreased to maintain the area of rectangle same ?

86. टिना हिने काही आंबे खरेदी केले. त्यातील 10% आंबे सडके होते. शिल्लक आंब्यांपैकी 80% आंबे तिने मित्रांना दिले. जर तिच्याकडे 45 आंबे उरले असतील तर तिने बाजारातून एकूण किती आंबे खरेदी केले ? Teena bought some mangoes of which 10% got rotten. She gave 80% of the remaining mangoes to her friends. If she is left out with 45 mangoes, then how many mangoes she bought from market ?

87. एका वस्तूवर दुकानदार ग्राहकास 10% सूट देतो, तरीही त्यास 25% नफा होतो, जर वस्तूची छापील किंमत 750 रुपये असेल तर दुकानदाराने ती वस्तू किती किंमतीला खरेदी केली असेल ? A shopkeeper sells an item on 10% discount, still he gets 25% profit. If the printed price of the item is Rs. 750, then on what price the shopkeeper purchased the item ?

88. सोडवा : (45+245)÷(320180)(\sqrt{45}+\sqrt{245})\div(\sqrt{320}-\sqrt{180}) Simplify: (45+245)÷(320180)(\sqrt{45}+\sqrt{245})\div(\sqrt{320}-\sqrt{180})

89. दोन रेल्वेगाड्या एकाच देशाने अनुक्रमे 112 किलोमीटर / ताशी व 76 किलोमीटर / ताशी या वेगाने धावत आहेत. वेगवान गाडी ही धीम्या गाडीत बसलेल्या एका व्यक्तीला 20 सेकंदात ओलांडते तर वेगवान गाडीची लांबी किती ? Two trains are moving in the same direction at speeds of 112 km/hr112\text{ km/hr} and 76 km/hr76\text{ km/hr} respectively. If the faster train crosses a person sitting in the slower train in 20 seconds, what is the length of the faster train ?

90. एक दुकानदार एक वस्तुची खरेदी रु. 1,200 मध्ये करतो व ती विकतो जेणेकरून त्याला 20% नफा होईल. नंतर तो मार्क केलेल्या किंमतीवर 10% सूट देतो. वस्तुची मार्क केलेली किंमत किती आहे ? A shopkeeper buys an article for Rs. 1,200 and sells it in such a way that he earns a profit of 20%. He then offers a discount of 10% on marked price. What is the marked price of article?

91. खालील दोन विधानांपैकी एक प्रतिपादन (A) व एक कारण (R) असे दिले आहेत. प्रतिपादन व कारण या दोघांतील परस्पर संबंध खाली दिलेल्या पर्यायी उत्तरांमधून शोधा.
प्रतिपादन (A) : कापसाची गाळाच्या जमिनीत वाढ होते.
कारण (R) : गाळाच्या जमिनी ह्या खूप सुपिक असतात.
There are two statements Assertion (A) and Reason (R) given below. Find the suitable relationship between the Assertion and Reason as per given options below.
Assertion (A): Cotton is grown in alluvial soils.
Reason (R): Alluvial soils are very fertile.

92. एका शाळेमध्ये A, B, C, D, E आणि F अशा सहा व्यक्ती शिक्षक म्हणून कार्यरत आहेत. प्रत्येक शिक्षक दोन विषय शिकवतात त्यापैकी एक अनिवार्य विषय आहे आणि दुसरा ऐच्छिक विषय आहे. D चा ऐच्छिक विषय इतिहास आहे जो की इतर तीन जणांचा अनिवार्य विषय आहे. E आणि F यांचा दोन पैकी एक विषय भौतिकशास्त्र आहे. F चा गणित हा अनिवार्य विषय असून तो C आणि E चा ऐच्छिक विषय आहे. इतिहास आणि इंग्रजी हे A चे विषय आहेत, परंतू अनिवार्य आणि ऐच्छिक विषय म्हणून ते D च्या अगदी उलट आहेत. रसायनशास्त्र हो केवळ एका शिक्षकाचा ऐच्छिक विषय आहे. यामध्ये शाळेतील एकमेव महिला शिक्षिकेचा अनिवार्य विषय इंग्रजी आहे, तर C चा अनिवार्य विषय कोणता आहे ? There are six persons A, B, C, D, E and F in a school, work as teachers. Each of the teacher teaches two subjects, one compulsory subject and the other optional subject. D's optional subject was history, while three others have it as compulsory subject. E and F have physics as one of their subjects. F's compulsory subject is maths which is an optional subject of both C and E. History and English are A's subject but in terms of compulsory and optional subjects they are just reverse of those of D's. Chemistry is an optional subject of one of them. The only female teacher in the school has English as compulsory subject. Then what is C's compulsory subject ?

93. जर ++ म्हणजे ×\times, ×\times म्हणजे ÷\div, ÷\div म्हणजे - आणि - म्हणजे ++, तर (231×11+2382÷40)(231\times11+23-82\div40) ची किंमत किती ? If ++ means ×\times, ×\times means ÷\div, ÷\div means - and - means ++, what is the value of (231×11+2382÷40)(231\times11+23-82\div40)?

94. खालीलपैकी कोणती वेन आकृती दिलेल्या तीन वर्गांचे सर्वोत्तम प्रतिनिधित्व करते : चौरस, चौकोन, समभुज चौकोन. Which of the following venn diagrams best illustrates the three classes: square, quadrilaterals, rhombus.

95. जर 2x+3y=1182x+3y=118 आणि 2x3y=622x-3y=-62 तर 'y' ची किंमत किती ? If 2x+3y=1182x+3y=118 and 2x3y=622x-3y=-62, then what is the value of yy?

96. एक चोर एका घरात त्याची लूट लपवतो. पोलिस त्याचा पाठलाग करत असतांना, तो पश्चिमे कडे 2 किमी धावतो आणि नंतर उजवीकडे वळतो आणि आणखी 2 किमी धावतो. नंतर तो उजवीकडे वळतो आणि आणखी 7 किमी धावतो. शेवटी, तो उजवीकडे दोन वळणे घेतो आणि प्रत्येक वळण घेतल्यावर 2 किमी धावतो आणि पोलिसांना हरवतो. ज्या घरात त्याने लूट लपवली होती, त्या घरात पोहचण्यासाठी त्याला किती अंतर चालावे लागेल ? A thief hides his loot in a house. As the police chases him, he runs 2 km to the West. Then take right turn and run for another 2 km. He then takes a right turn and runs for another 7 km. Finally, he takes two right turns and runs 2 km after taking each turn and defeats the police. How much distance he has to cover to reach to the house in which he had hidden the loot ?

97. अक्षरांमधील वगळलेल्या अक्षरांची संख्या प्रत्येक वेळी एकाने कमी होत जाते. या नियमाचे पालन करणारी खालीलपैकी कोणती अक्षरमालिका आहे ? Every time number of letters skipped in between adjacent letters of the series decreases by one. Which of the following series is observing this rule ?

98. प्रज्ञाची बस शाळेत पोहोचली तेव्हा दक्षिणेकडे तोंड करून उभी होती. घरून निघाल्यावर ती दोन वेळा डावीकडे एक वेळा उजवीकडे वळली तर घरून निघताना तिचे तोंड / चेहरा कोणत्या दिशेला होता ? When Pradya's bus reached school, it was facing South. After leaving home, she turned left twice and right once. In which direction was she facing when she left home?

99. खालील चौरसात प्रश्न चिन्हाच्या (?) जागी कोणती संख्या येईल ?

100. प्रश्न चिन्हाच्या ठिकाणी योग्य अंक शोधा. 14,27,44,?,90,119,15214, 27, 44, ?, 90, 119, 152 Find out the missing number in place of question mark.